संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

विनोद कांबळीने पत्नीवर फेकला तवा! मारहाणीविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वेगवेगळ्या वादामुळे कायम चर्चेत असतो. अशातच कांबळीविरोधात त्याच्या पत्नीने दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप करत वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. या तक्रारीमुळे कांबळी पुन्हा चर्चेत आला आहे.

तक्रारीनुसार विनोद दारू पिऊन घरी आला होता. घरात येताच त्याला पत्नीने हटकले. त्यामुळे त्याला राग आला. त्याने स्वयंपाक घरातील तवा पत्नीच्या दिशेने फेकून मारला. तसेच तिला शिवीगाळ केली. या घटनेत अँड्रियाच्या डोक्याला जखम झाली. ही घटना त्यांच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये घडली.

पत्नीला मारहाण करताना घटनास्थळी त्यांचा १२ वर्षीय मुलगा उपस्थित होता. त्याने वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात कांबळीने पत्नीला मारले. त्यानुसार, आयपीएस ३२४ आणि ५०४ अंतर्गत वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर पोलिस त्याच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्याला कलम ४१अ सीआरपीसी अंतर्गत नोटीस बजावली व पोलिस स्थानकात हजर राहून त्याची बाजू मांडण्यात सांगितली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या