मुंबई- आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने गुरुवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व कामबंद आंदोलन पुकारले होते. राज्यातील सर्व १३ अकृषी विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.
जुनी पेन्शन, आश्वासित प्रगती योजना, शिक्षकेतर कर्मचारी भरती, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.