संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 26 March 2023

विठुरायाच्या दानपेटीमध्ये दोन कोटींचे गुप्त सुवर्णदान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न

पंढरपूर – विठूरायाच्या दानपेटीत आजवरचे सर्वात मोठे दान जमा झाले आहे. तब्बल दोन कोटींच्या सुवर्ण दागिन्यांचे गुप्त दान विठूरायाच्या चरणी अर्पण करण्यात आले आहे. या भाविकाकडून रेशमी वस्त्राचा पोशाखही विठू माऊलीसाठी देण्यात आला आहे .

आता विठूरायाच्या दानपेटीत तब्बल दोन कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर पडली आहे. जालन्यातील एका भाविकाने हे गुप्त दान केले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी या भक्ताने ही भेट दिली. यात दोन सोन्याचे मुकुट,सोन्याच्या बांगड्या आणि सोन्या चांदीचे रुखवत असे दागिने विठूरायाच्या चरणी अर्पण केले आहेत. तसेच विठुरायासाठी रेशमी वस्त्राचा पोशाखदेखील भेट दिला आहे. हे सर्व दागिने मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न

पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुरुवारी विवाह सोहळा पार पडला. माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंतपंचमीच्या मुहुर्तावर विठ्ठल रुक्मिणीचं लग्न लावण्यात आले. मत्स्य मंडप फुलांनी सजवण्यात आला होता.विठ्ठल मंदिराला पुण्याचे भाविक भारत भुजबळ यांनी सात टन फुलांनी सजवले होते.स्वयंवर ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे माघ शुक्ल पंचमी ही कृष्ण रूक्मिणी विवाहाची तिथी आहे.त्यामुळे वसंतपंचमीला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सजवण्यात आल्या. या विवाह सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या सुमधूर आवाजात उपस्थितांनी अक्षता टाकल्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या