पंढरपूर- पंढरपूरच्या विठुरायाची तुळशीपूजा तब्बल आठ वर्षांपासून बंद होती. ही पूजा गुढीपाडव्यापासून पुन्हा सूरू होणार आहे. तुळशी अर्चन पूजेस पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. हा निर्णय बुधवारी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
देशभरातील भाविक पंढरपूरला आल्यावर अनेकांना देवाची पूजा करण्याची इच्छा होत असते. सध्या एक नित्यपूजा आणि 10 पाद्यपूजा एवढ्याच पूजा होत असून याचेही वर्षभराचे बुकिंग खूप आधीच होत असल्याने भाविकांना देवाची पूजा करण्याची इच्छा पूर्ण करता येत नव्हती. आत रोज देवाची तुळशी अर्चन पूजा करण्याबाबत निर्णय झाल्याने आलेल्या भाविकांना ही पूजा करता येणार आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.