संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

विठुरायाचा प्रसाद महागला; लाडू २० रुपयांना मिळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कोरोनामुळे सध्या पंढरपूरच्या विठुरायाच्या लाडू प्रसादाची विक्री बंदी आहे. मात्र आता आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा लाडू प्रसाद विक्री करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असून साखर, तेल, डाळीसह मजूरी दरात वाढ झाल्याने त्यात 35 ते 40 टक्के इतकी दरवाढ करायचे ठरविले आहे. त्यामुळे आता भाविकांना 140 ग्रॅम वजनाच्या दोन लाडूंसाठी 20 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी लाडू 15 रुपयांना मिळत होता.

गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूची विक्री करण्यास सुरुवात केली होती. वारकर्‍यांमध्ये हा लाडू प्रसाद खूपच लोकप्रिय झाला होता. वर्षभरात साधारण 50 ते 55 लाख लाडूंची विक्री होऊन समितीला यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत होते. कोरोना काळात दोन वर्ष हा लाडू प्रसाद समितीने बंद केला होता. मंदिर सुरू होऊनही लाडू प्रसाद मिळत नसल्याने भाविकांमध्ये नाराजी होती. आता आषाढीपूर्वी लाडू देण्याची तयारी असून लाडू प्रसाद मात्र 20 रुपये होणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami