संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

विटा शहरातील वयोवृद्ध डॉक्टरची रुग्णालयातच गळफासाने आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सांगली – जिल्ह्यातील विटा शहरातील प्रसिद्ध,वयोवृद्ध डॉक्टर रेवबा ऊर्फ आर.आर.पवार यांनी आपल्याच रुग्णालयात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.ते ७० वर्षांचे होते.त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी,सून,नातवंडे असा परिवार आहे.
आत्महत्या केलेले डॉ.रावसाहेब पवार यांचे शहरातील पंचमुखी गणपती मंदिराजवळ शालीमार ज्वेलर्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पवार हॉस्पिटल नावाचे हॉस्पिटल आहे.
डॉ.पवार हे सहभाग घ्यायचे.आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबर सामाजिक कार्यातही नेहमी गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर पवार हे त्याठिकाणी रुग्णसेवा करत होते.मात्र मागील काही महिन्यापासून त्यांनी आपली प्रॅक्टिस बंद केली होती.तरीही ते अधूनमधून आपल्या रुग्णालयात जावून बसत असत.काल रविवारी ते असेच आपल्या रुग्णालयात गेले होते.त्यावेळी तिथे कुणी नसल्याचे पाहून त्यांनी पंख्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त शहरात पसरताच त्यांच्या रुग्णालयाबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami