वाशी: मुंबई कृषी उत्पन्न फळ बजार समितीत नोव्हेंबर महिन्यापासून गावठी मोसंबी व संत्री या फळांचा हंगाम सुरू आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळबाजारात संत्र्याची आवक वाढू लागली आहे. बाजारात सध्या नागपूरची गोड संत्र्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे ग्राहक चेन्नईच्या आंबट मोसंबीपेक्षा नागपूरच्या गोड संत्र्याला जास्त पसंती देताना दिसत आहेत. बाजार समितीत दिवसाला संत्र्याच्या जवळपास ४० गाड्यांची आवक होत आहे. यापैकी ६० टक्के आवक ही नागपूरमधून आणि अहमदनगर होत आहे. मंबई एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्याला किलोमागे सध्या ३५ ते ५० रुपयांचा दर आहे. डिसेंबरमध्ये संत्रा आवक जास्त वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान विदर्भातील संत्री उत्पादक आणि निर्यातदार अडचणी सापडले आहे.संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी सध्या छोट्या आकाराची संत्री फेकून देत आहेत. बांगलादेशने भारतीय संत्र्यांवरील आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे बांगलादेशात वैदर्भीय संत्री महाग होऊनही त्याचा पुरवठा कमालीचा घटला आहे. चांगल्या मात्र आकाराने छोट्या संत्र्यांना कोणीच खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांवर ते फेकून देण्याची वेळ आली आहे.