संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

वाळूशिल्पकाराने मोदींना दिल्या १,२१३ चहाच्या कपांमधून शुभेच्छा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध वाळूशिल्पकार शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी मोदींना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांनी ओडिशाच्या पुरी समुद्र किनाऱ्यावर १,२१३ मातीच्या चहाच्या कपांमधून पंतप्रधान मोदींचे शिल्प बनवले आहे.
कलाकार पटनायक यांनी बनवलेल्या या ५ फूट उंचीच्या पुतळ्यासाठी त्यांनी सुमारे ५ टन वाळू वापरली आहे.याशिवाय त्यांनी वाळूवर ‘हॅपी बर्थडे मोदीजी’ असा संदेशही लिहिला आहे. दरवर्षी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला पटनायक वेगवेगळ्या प्रकारे वाळूची शिल्पे बनवतात.यावर्षी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुदर्शन म्हणाले,’आम्ही वाळूच्या शिल्पात मातीच्या चहाचे कप वापरून मोदींचा चहा विक्रेता ते भारताचे पंतप्रधान असा प्रवास दाखवला आहे. आज पुन्हा एकदा आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आहोत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami