संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

वाराणसीत बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी वलीउल्लाहला फाशी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गाझियाबाद – 16 वर्षे जुन्या वाराणसी साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी मोहम्मद वल्लीउल्लाला गाझियाबाद न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणात फाशी तर दुसर्‍या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी वल्लीउल्लाला शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले होते. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांनी वाराणसीमधील संकटमोचन मंदिरात झालेल्या स्फोटात वल्लीउल्लाला दोषी ठरवले होते. येथे बॉम्बचा स्फोट होऊन सात जणांचा मृत्यू झाला होता. दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडल्याप्रकरणीही जिल्हा न्यायाधीशांनी वल्लीउल्लाला दोषी ठरवले होते. मोहम्मद वलीउल्लाला सोमवारी कडेकोट बंदोबस्तात जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानुसार न्यायालय संकुलाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. बॉम्ब व श्‍वान पथकाकडून न्यायालयाच्या परिसरात कसून झडती घेण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami