संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

वातानुकूलित लोकलचे रडगाणे
संतप्त प्रवाशांची रेल्वेकडे तक्रार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डोंबिवली – मध्य रेल्वेने सुरू केलेल्या वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु या गाड्या नियमितपणे आपल्या संभाव्य वेळेपेक्षा गंतव्य स्थानी उशिराने पोहोचत असल्याने जास्तीचे पैसे मोजून देखील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण स्थानकातून सकाळी 8.54 वाजता सुटणारी जलद लोकल सध्या जवळपास दररोज उशिराने सुटते आणि आपल्या निर्धारित वेळेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उशिराने पोहोचते.
या लोकलचे कल्याण येथील नियमित प्रवासी जनार्दन महाजन यांनी तर ट्रेनमधील इतर सहप्रवाशांच्या सह्यांचे एक निवेदन थेट रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना दिले आहे. या निवेदनात वातानुकूलित लोकलच्या उशिराबाबत, गळके बोगी, ट्रेनमधील अनियमित थंडावा याबाबत तक्रारीचा उल्लेख केला आहे. 16 जून रोजी या 8.54 च्या कल्याण लोकलमध्ये वातानुकूलित यंत्रणा सुरू नव्हती. ठाणे स्टेशन पार केले तरी थंडावा नसल्याने प्रवासी हैराण झाले होते. त्याचवेळी तिथे तिकीट तपासनीस आणि एक आरपीएफ जवान आला. त्यांच्याकडे महाजन आणि इतर प्रवाशांनी तक्रार केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami