मुंबई- मुंबईतील वांद्रे येथील लिंकरोड परिसरात आज बेस्ट बसला आग लागली. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाही. बसमधील प्रवाश्यांनी प्रसंगावधान राखत बस बाहेर धाव घेतली. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
वांद्रे येथे बेस्ट बसला आज दुपारी आग लागली. प्रवाश्यांनी भरलेल्या बसला अचानक आग लागल्याने लोक सैरावैरा पळू लागले. बसला आग लागल्यावर प्रवासीही लगबगीने बस बाहेर आले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.