संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

वांद्रेतील “आप’चे कार्यालय फोडले! कडक कारवाईची “आप’ची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- आम आदमी पक्षाच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर मंगळवारी रात्री काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. त्यात कोणीही जखमी झाले नसले तरी कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यातील गुंडांवर तात्काळ कडक कारवाई करा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.
महाराष्ट्र आणि मुंबई आम आदमी पार्टीची ताकद वाढत आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आपने आवाज उठवला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आपला यश मिळणार आहे. ते काँग्रेस आणि भाजपला खटकले आहे. त्यातूनच त्यांनी वांद्रे पूर्व येथील आपच्या कार्यालयावर हल्ला चढवून मोडतोड केली. भाजपमध्ये समाजकंटकांचा भरणा आहे. काँग्रेस पक्ष संपला आहे. त्यांचे भ्रष्टाचारी लोक भाजपमध्ये गेले आहेत. उरलेले चांगले आपमध्ये येत आहेत. तेव्हा पोलिसांनी कार्यालय फोडणाऱ्या गुंडांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami