संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

वसईत इलेक्ट्रिक बाइकमधील बॅटरीच्या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : वसई पूर्व भागातील रामदास नगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करत असताना अचानक स्फोट झाला, त्यामुळे घराला आग लागली. दरम्यान त्या आगीत भाजल्याने सात वर्षीय शब्बीर अन्सारी याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी वसई माणिकपूर पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीरचे वडील शरफराज बेडरूममध्ये होते. तर शब्बीर आणि त्याची आजी हॉलमध्ये झोपली होती.

यादरम्यान चॅर्जींग लावलेल्या बॅटरीने अचानक पेट घेतला आणि घराला आग लागली. दरम्यान शब्बीर त्या आगीत भाजला गेला. शरफराज यांंनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णाल्यात नेले परंतु त्याने अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी वसई माणिकपूर पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. चार्जींग सुरु असताना बॅटरीचा स्फोट कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत शब्बीरचे वडील शरफराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे २ वाजून ३० मिनीटांनी इलेक्ट्रीक वाहनातील बॅटरी काढून लावलेल्या चार्जींगने अचानक पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पेट घेतला आणि हॉलला आग लागली. यात मुलगा आगीत जळाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र ज्यांवेळ निघून गेला असल्याचे ते म्हणाले. ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटी आहे त्यांनी बाईकची बॅटरी घरात आणून चार्ज न करण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami