संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

वसईत अखेर पारपत्र कार्यालय
दिवसाला करता येणार ४० अर्ज

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वसई :पारपत्रासाठी पालघर वासियांना ठाने गाठावे लागत होते. मात्र आता मागील काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पारपत्र कार्यालय अखेर वसईतील एव्हरशाईन येथे सुरू करण्यात आले आहे. नुकतेच केंद्रीय परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. दिवसाला आता ४० अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालघर वासियांना आता दिलासा मिळाला आहे.
पालघर जिल्ह्यातील नागरिक विदेशात फिरण्यासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी जात असतात. त्यासाठी पारपत्राची गरज भासते; परंतु जिल्ह्य़ात पारपत्र काढण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने ठाणे व मालाड येथे जावे लागत होते. त्यात वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाया जात असतात. शहरात स्वतंत्र पारपत्र कार्यालय सुरू करण्याची मागणी येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. अखेर संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घारन करण्यात आले. याबाबत पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनीही पाठपुरावा सुरू कला.प्रसंगी राजेंद्र गावित यांच्यासह प्रादेशिक पारपत्र अधिकारी मुंबई डॉ. राजेश गवांडे, नवी मुंबई टपाल विभाग अधिकारी सुश्री सरन्या, पोलीस सहआयुक्त श्रीकांत पाठक, प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे, तहसीलदार उज्ज्वला भगत यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami