नागपूर- शहरातील ज्येष्ठ साहित्यिक वसंत महादेवराव चिंचाळकर यांचे मंगळवारी संध्याकाळी एका खासगी इस्पितळात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कथा, प्रवासवर्णने, निबंध, ललितसंग्रह आणि आत्मकथन असे विविध साहित्यप्रकार चिंचाळकर यांनी हाताळले आहेत. पाखरांचे परगणे, वळचणीचा पाऊस, प्रकाशफुले अशी त्यांची विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या दीर्घ सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लेखनाला आणि समाजसेवेला झोकून घेतले होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
वसंतराव चिंचाळकर यांच्या पश्चात पत्नी मृणालिनी, पूत्र आदित्य, सुन श्रद्धा आणि मोठा आप्तपरिवार आहे. ११, गीताश्री, गोपाल कॉलनी, बोरकुुटे ले आऊट, नरेंद्रनगर या त्यांच्या निवासस्थाना मानेवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले