संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

वर्षभरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या
६३ नागरिकांवर विमान प्रवास बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – विमान प्रवास करताना मास्क न वापरणे आणि विमानातील क्रू मेंबर्सनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे या कारणांवरून गेल्यावर्षी ६३ नागरिकांवर विमान प्रवास बंदीची कारवाई करण्यात आली आहे.या बेशिस्त वर्तन करणाऱ्या प्रवाशांना वेगवेगळ्या कालावधीसाठी नो -फ्लाय झोनमध्ये टाकले होते, अशी माहिती नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री व्ही. के.सिंग यांनी एका लेखी उत्तरात काल शुक्रवारी दिली आहे.
विमान प्रवास करताना हिंसाचाराच्या घटना वाढत चालल्या असल्याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात नागरी विमान वाहतुक मंत्रालयाने संसदेत माहिती दिली.गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एअर इंडियाच्या अमेरिकेला जाणार्‍या विमानात एका व्यक्तीने दारूच्या नशेत वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याची घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपी शंकर मिश्रा याला अटक केली असून तो सध्या जामिनावर आहे.तसेच पॅरिसहून दिल्लीला येणार्‍या एअर इंडियाच्याच विमानात अशीच बेशिस्त घटना घडली होती.एकाने शौचालयात धूम्रपान तर दुसरा प्रवासी म्हटलेल्या सीटवर बसला होता.या घटनांवरून १० लाख दंड आणि लघुशंका केल्याच्या घटनेवरून ३० लाख रुपये दंड विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला ठोठावला होता अशी माहितीही नागरी विमान वाहतुक मंत्रालयाने काल संसदेत दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या