संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

वनरक्षक कुंदन भोईर मृत्यूप्रकरणी दीड महिन्यांनी १० जणांवर गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शहापूर- दीड महिन्यापूर्वी शहापूर तालुक्यातील माहुली धबधब्यात वन विभागाचे वनरक्षक कुंदन वामन भोईर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.याप्रकरणी आता शहापूर न्यायालयाच्या आदेशानंतर १० जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही.मृत वनरक्षक कुंदन भोईर यांच्या पत्नीने पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप केला आहे. माझ्या पतीच्या हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी कुंदन यांच्या पत्नी सुप्रिया भोईर यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नी सुप्रिया भोईर यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याचे साकडे शहापूर पोलिसांना घातले होते. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती.दीड महिन्यापूर्वी वनरक्षक कुंदन भोईर यांचा माहुली धबधब्यात संशयास्पद मृत्यू झाला होता.पतीच्या मृत्यूनंतर सोबत असलेले सर्वजण तेथून पळून गेले. त्यामुळे कुठल्या तरी कारणावरून पतीचा घातपात घडविण्यात आला आहे, असा संशय सुप्रिया भोईर यांनी व्यक्त केला होता. घटनास्थळावरील त्यांच्या सोबतच्या ११ जणांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी शहापूर पोलिसांना केली होती. मात्र पोलिसांनी सुप्रिया भोईर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.शहापूर पोलिस ठाण्यात तब्बल दीड महिन्यानंतर वनरक्षक कुंदन वामन भोईर यांच्या हत्येप्रकरणी १० जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील बहुतांशी आरोपी शहापूर वन विभागातील वन कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील कर्मचारी आहेत.याप्रकरणी आठ दिवस उलटूनही अद्याप एकाही आरोपीला पोलिसांकडून अटक झालेली नाही.पोलिसांकडून आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मृत कुंदन भोईर यांच्या पत्नी सुप्रिया भोईर,भाऊ चंदन भोईर, वडील वामन भोईर यांनी शहापूर विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. हे प्रकरण शहापूर पोलिसांकडून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मृत कुंदन भोईर यांच्या पत्नी सुप्रिया भोईर यांनी केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami