संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

वंदे भारतला ‘वापी “मध्ये अतिरिक्त थांबा अन्य स्थानकांचे वेळापत्रक बदलले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*सूरत स्थानकावर गाडी १० मिनिटे उशिराने जाणार

मुंबई- मुंबई सेंट्रल गांधीनगर कॅपिटल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.या नवीन वेळापत्रकानुसार वापी स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.तसेच सूरत स्थानकावर आता ही गाडी आधीपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहचेल.दरम्यान या वापी स्थानकावरील अतिरिक्त थांब्यामुळे रेल्वेच्या इतर स्थानकांच्या वेळेत २६ ऑक्टोबरपासून बदल करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल- गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेस २६ ऑक्टोबरपासून सकाळी ८.०४ वाजता वापी स्थानकावर पोहोचेल आणि ८.०६ वाजता सुटेल. तसेच सुरत स्थानकावर ट्रेन आता सकाळी ८.५० ऐवजी सकाळी ९.०० वाजता पोहोचेल.गाडी आता वडोदरा स्थानकावर सकाळी १०.१० ऐवजी आता सकाळी १०.१३ वाजता पोहोचेल.अहमदाबाद स्थानकाच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.तसेच गांधीनगर कॅपिटल- मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसच्या अहमदाबाद आणि वडोदरा स्थानकांवरील (आगमन / प्रस्थान) कोणताही बदल होणार नाही; सुरत स्थानकावर गाडी आता संध्याकाळी ५.२३ ऐवजी संध्याकाळी ५.१० वाजता पोहोचेल. ही गाडी वापी स्थानकात संध्याकाळी ६.३८ वाजता पोहोचेल आणि ६.४० वाजता निघेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami