संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

लोणावळ्यातील पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण निसर्गरम्य वातावरणात फिरायला जाण्यासाठी नियोजन करत असतात. दरवर्षी पावसाळ्यात बऱ्याच पर्यटकांची पावले ही लोणावळ्यात वळत असतात. लोणावळा हे मावळ तालुक्यातील पर्यटनाचे केंद्र असून येथे पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाची करडी नजर पर्यटकांवर असणार आहे.

लोणावळ्यात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी शहर आणि परिसरात तीन ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. मुंबईवरून येताना खंडाळा येथे एक चेक पोस्ट तर पुण्यावरून येताना कुमार चौकात दुसरी चेक पोस्ट आणि भुशी डॅम आणि टायगर पॉईंटला सहारा ब्रिजवर चेक पोस्ट लावून पोलिसांची करडी नजर पर्यटकांवर असणार आहे.

याशिवाय मद्यपान करुन धिंगाणा घालणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा लोणावळा पोलीस प्रशासनाने दिला आहे. दरम्यान,पर्यटकांनी पर्यटनस्थळी येताना काळजी घ्यावी आणि शिस्त पाळावी, असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami