संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

लोकांना फसवणाऱ्या कंपनीची मनसे पदाधिकाऱ्यांनी बाजू घेतल्याचा आरोप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंद्रपूर- जादा व्याजाचे आमिष दाखवून विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांमधील गुंतवणूकदारांची १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक कलकाम कंपनीने केली. त्यानंतरही मनसे पदाधिकाऱ्यांनी फसवणूक करणाऱ्या कंपनीचीच बाजू घेतली. आणि हजारो गुंतवणूकदारांवर अन्याय केला, असा आरोप कलकाम कंपनीत फसवू झालेल्या गुंतवणूकदारांनी केला आहे. त्यामुळे विदर्भात मनसे नेत्यांची अडचण झाली आहे. या संदर्भात हे गुंतवणूकदार राज ठाकरे यांना भेटण्याची शक्यता आहे.
भरमसाठ व्यास देऊन कमी गुंतवणुकीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कलकाम कंपनीने विदर्भातील लोकांना दाखवले. त्यामुळे गडचिरोली, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. कंपनीकडे १०० कोटींपेक्षा अधिक ठेवी जमा झाल्या. सुरुवातीला काही दिवस काही गुंतवणूकदारांना याचा लाभ मिळाला. मात्र नंतर कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी ठेवींचे पैसे परत मागितले. मात्र कंपनीने त्यांचे पैसे दिले नाहीत. त्यात विदर्भातील गुंतवणूकदारांचे १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी न्यायासाठी मनसेकडे धाव घेतली. मनसेच्या शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर आणि वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांनी गुंतवणूकदारांना तुमचे पैसे परत मिळवून देतो, असे आश्वासन दिले. मात्र नंतर त्यांनी कंपनीच्या संचालकांची बाजू घेऊन गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडले. एवढेच नाही तर गुंतवणूकदारांनी कंपनीच्या संचालकांकडे पैसे परत मागण्याचा तगादा लावू नये यासाठी त्यांच्यावर दबाव आणून त्यांनाच धमकावण्यास सुरुवात केली. २०१७ पासून मनसे फसवणूक करणाऱ्या कंपनीला आणि तिच्या संचालकांना संरक्षण देत आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. यात मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनीही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली, असा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यात हा प्रकार उघड झाल्याने त्याचा परिणाम दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात आमचा कोणताच हात नाही. आम्हाला गोवले जात आहे. आम्ही आमची बाजू जाहीरपणे मांडली आहे. यात अनेकांना अटक झाली आहे, असा दावा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami