संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

लोकांचा विरोध असताना गोव्याच्या सांगे तालुक्यात आयआयटी प्रकल्प नको

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

* कॉंग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची भूमिका

मडगाव – दक्षिण गोव्यातील सांगे तालुक्यात उभारला जाणारा प्रस्तावित आयआयटी प्रकल्प हा गोमंतकीयांच्या भल्याचा नसून लोकांचा विरोध असताना असा प्रकल्प नकोच अशी भूमिका दक्षिण गोव्याचे कॉंग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी मांडली आहे.ते मडगाव येथील कॉंग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी खासदार फ्रान्सिस सार्दिन पुढे म्हणाले की, केवळ सत्ता आणि नगरसेवकांवर सातत्याने आपले वर्चस्व राखण्यासाठी सरकारकडून पालिका कायद्यात बदल केला जात आहे.देशाप्रमाणे गोवा राज्यातही लोकशाही संपविण्याचा भाजपा सरकारची चाल आहे.खरे तर सांगे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी आणि बागायतीवर नांगर फिरवून आयआयटी उभारण्यास लोकांचा विरोध होत आहे. जरी या प्रकल्पामुळे बाहेरील विद्यार्थ्यांबरोबर स्थानिक मुलांना फायदा होणार असला तरी लोकांचा विरोध असताना हा प्रकल्प उभारला जावू नये.हे राज्यासाठी आणि गोमंतकीयांसाठी हीताचे नाही.विशेष म्हणजे आयआयटी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न याआधी वाळपाई येथे झाला होता.
खरे तर हा प्रकल्प स्थानिक आमदाराच हव आहे.कारण त्यात यांच्या काही जमिनी जात नाहीत.जमिनी जाणाऱ्या लोकांना जर हा प्रकल्प नको असेल तर तो कदापि उभारला जावू नये, असे मत खासदार सार्दिन यांनी यावेळी व्यक्त केले.दरम्यान,राज्यात ड्रग्ज,
बलात्कार,खून अशा गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे.बाहेरील पोलीस आपल्या राज्यात येऊन कारवाई करत आहेत,पण सरकारकडून काही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याचे खासदार सार्दिन यावेळी म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या