शिंघाई – चीनच्या ग्वाँग्झूमध्ये कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनविरोधात नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवला. अनेक ठिकाणी नागरिकांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याविरोधात निदर्शने करत जोरदार घोषणा दिल्या. अनेक वाहनांची जाळपोळही केली. तसेच सव्वा कोटी लोकसंख्येच्या जाँगक्विंगमध्ये कोरोनाबाधितांमध्ये घट झाली नाही तर नागरिकांमधील असंतोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांचे झीरो कोविड धोरण अयशस्वी ठरू लागले असून अनेक प्रांतांतील कोरोनाबाधित संख्या वाढत जात आहे. बीजिंग, ग्वाँग्झू, जाँगक्विंगमध्ये दररोज सुमारे 24 हजार नवे बाधित आढळून आले आहेत. चीनच्या 85 शहरांत पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. तेथील रस्त्यावरील वर्दळही कमी झाली असून तेथील 65 कोटी लोकांना लॉकडाऊनचा फटका बसू शकतो.