संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

लॉकडाऊनमध्ये शिक्षण सुटले; राज्यातील बालकामगारांच्या संख्येत वाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कोरोना लॉकडाऊनचा फटका अगदी सर्वच क्षेत्रांना बसला. या काळात अनेक बालकांनी आपले शिक्षण सोडून नोकरीची वाट धरली. परिणामी लॉकडाऊन काळात राज्यातील बालकामगारांचे प्रमाण प्रचंड वाढले. ‘क्राय’ या सेवाभावी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जालना, अहमदनगर, लातूर, वर्धा, नंदुरबार, परभणी या सहा जिल्ह्यांतील बालकामगारांचा एकूण आकडा २०२० मध्ये २ हजार ५५६ इतका होता. जो २०२१ मध्ये ३ हजार ३५६ वर गेला. तर, सध्या २०२२ मध्ये ही आकडेवारी ३ हजार ३०९ इतकी आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील परिस्थितीप्रमाणेच शहरी भागातील परिस्थितीही गंभीर आहे.

सर्वेक्षणादरम्यान वांद्रेच्या राहुल नगर, सायन कोळीवाडा आणि मानखुर्दच्या चित्ता कॅम्पमध्ये १४ ते १८ वर्षे वयोगटातील ५८९ मुलांपैकी १४५ मुले सध्या वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये गुंतलेली असून त्यापैकी ८४ मुली स्वयंपाक, झाडू मारणे, कपडे आणि भांडी धुणे, तसेच वृद्ध व लहानग्यांची काळजी घेणे अशा घरकामांत गुंतलेल्या असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वाढते बालकामगार हा आता चिंतेचा विषय झाला आहे.

दरम्यान, कोरोना लॉकडाऊनच्या गेल्या दोन वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक बदल झाले. शाळा बंद होणे, ऑनलाईन वर्गांसाठी मोबाईल नसणे, इंटरनेटची सुविधा नसणे, पालकांनी नोकरी गमावल्याने कुटुंबांवरील आर्थिक ताण या सर्व अडचणींमुळे मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम झाल्याचे निरीक्षण या संस्थेचे संचालक क्रियान रबाडी यांनी नोंदविले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami