हैद्राबाद – महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत गॅस गळती झाल्याने 25 विध्यार्थाना बाधा झाली असून या सर्वाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.
हैद्राबादच्या कस्तुरबा गव्हर्मेंट महाविद्यालयाच्या प्रयोग शाळेत गॅस गळती झाली . यावेळी प्रोयोग शाळेत काही विध्यार्थी प्रॅक्टिकलसाठी आले होते . मात्र अचानक त्यांना श्वासोश्वासाचा त्रास जाणवू लागल्याने मोठी खळबळ माजली . दरम्यान गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच . गॅस कनेक्शन बंद करण्यात आले त्यानंतर विध्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रयोग शाळेत त्यावेई उपस्थित असलेल्या शिक्षकाची चौकशी केली आणि त्याच्याकडून माहिती घेतली . या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.