संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

लुफ्थांसा एअरलाईन्स कंपनीच्यावैमानिकांचा संप, प्रवासी संतप्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बर्लिन : लुफ्थांसा एअरलाइन्सचे वैमानिक अनेक महिन्यांपासून पगार वाढवण्याची मागणी करत आहेत.मात्र त्यांच्या मागणीची पूर्तता न झाल्यामुळे वैमानिकांनी संप पुकारला आहे. अशा स्थितीत आज विमान कंपन्यांची ८०० उड्डाणे रद्द करण्यात आली असून, 1.3 लाख प्रवाशांना फटका बसला. दरम्यान, लुफ्थांसा एअरलाइन्सने उड्डाण रद्द केल्याचा परिणाम भारतातही दिसून आला.तिकीट रद्द झाल्याने प्रवासी पैसे परत करण्याची मागणी करत आहे.
जर्मन विमान कंपनी लुफ्थांसा एअरलाइन्सचे वैमानिक अनेक महिन्यांपासून पगार वाढवण्याची मागणी करत आहेत. मागण्यांबाबत यापूर्वी वैमानिक संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाली होती. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे लुफ्थांसाचे वैमानिक आजपासून संपावर गेले आहेत. त्यांच्या संपामुळे 3,200 उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जर्मनीच्या इतिहासात विमान परिवहन क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संप आहे.रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांना तिकिट रद्द झाल्यानंतर पैसे परत करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.कंपनीच्या वैमानिकांनी मागील वर्षात वेतन वाढवण्याची मागणी केली होती. कंपनीने त्यांची ही मागणी फेटाळून लावल्याने कंपनीचे 4,500 वैमानिक चार दिवसांसाठी संपावर गेले आहेत.
लुफ्थांसा एअरलाइन्सने उड्डाण रद्द केल्याचा परिणाम भारतातही दिसून आला. शुक्रवारी सकाळी 12.15 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. हे प्रवासी त्यांचे पैसे परत करण्याची मागणी करत होते. लुफ्थांसा एअरलाईनची दोन उड्डाणे रद्द केल्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ उडाला. दरम्यान,लुफ्थांसा एअरलाइनचे उड्डाणे रद्द झाल्यामुळे जर्मनीसह युरोपच्या पर्यटन उद्योगालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami