संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

लाॅटरी प्रकरणात मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात करणात मनसेच्या तीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. रस्ते आस्थापना जिल्हा संघटक मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख प्रसाद शेट्ये आणि केदार वणंजू या तिघांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता या तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना 6 वर्षांसाठी निवडणुकीतून अपात्र करण्यात आले होते. त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवण्यात आले होते.महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही कारवाई करण्यात आली होती. विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले होते.

राजवैभव प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी खेड शहरात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. या उत्सवांदरम्यान भाविकांमध्ये लॉटरीची तिकीटे वाटून नशीबवान भाविकाला वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसे देऊन गौरविण्यात येते.दरम्यान मानवाधिकार पत्रकार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने मनसेचे वैभव खेडेकर यांच्या विरोधात खेड पोलिसात तक्रार दाखल होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami