संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

लावणीच्या नावाखाली अश्लीलता नको! अजित पवार यांची कार्यकर्त्यांना तंबी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य आहे. महाराषट्राची उच्चं परंपरा आहे. त्यामुळे ही परंपरा टिकायला हवी. मात्र आजकाल काही ठिकाणी लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्यांचे प्रकार घडतात. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे . राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या काही कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या लावणी नृत्याचा कार्यक्रम झाला होता त्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करीत कार्यकर्त्यांचे कान टोचले.

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्शवभूमीवर आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी सांगितले कि महाराष्ट्रात चालणारे लावणी अथवा इतर कार्यक्रम सर्वाना पाहता येतील असेच व्हायला हवेत. यामध्ये अश्लील प्रकार होऊ नयेत याबाबत आपण संबंधितांशी बोलून गरज भासल्यास येणाऱ्या अधिवेशनात अशा घटना राज्यात घडू नयेत यासाठी या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वाढणार आहे. कारण वडिलधाऱ्यांनी चालवत आणलेली महाराष्ट्राची उच्च परंपरा टिकली पाहिजे, पण कुणी चुकीचे वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी अधिवेशनात आपण आग्रही मागणी करणार आहे. तसेच आपल्या पक्षाच्या बैठकीत अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत असा निर्णय झालेला आहे. त्यानुसार पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षाना ताशा सूचना देण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या