गांधीनगर:- आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. सुरेंद्रनगर येथील एका सभेला संभोधित करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे नेते मोदींना लायकी दाखवण्याची भाषा करतात. हा त्यांचा अहंकार आहे. तुम्ही राजघराण्यातील आहात. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझी काहीच लायकी नाही. तुम्ही माझी औकात दाखवा. मी सेवादार आहे. सेवादाराची औकात नसते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांनी मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, गुजरात निवडणुकीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची लायकी दाखवणार आहेत. मोदींनी कितीही प्रयत्न केले तरी ते सरदार पटेल होऊ शकत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, निवडणुकीच्या काळात विकासावर बोलण्याऐवजी काँग्रेस म्हणतंय की आम्ही मोदींना त्यांची लायकी दाखवू. यापूर्वीही काँग्रेसने माझ्यासाठी ‘नीच माणूस’, ‘मौत का सौदागर’ आणि ‘नाल्यातील कीडा’ असे शब्द वापरले होते. आता निवडणुकीच्या काळात विकासावर बोलण्याऐवजी मोदींना त्यांची लायकी दाखवून देऊ, असे काँग्रेस नेते सांगत आहेत.