संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

लाखो खटले प्रलंबीत! न्यायमूर्तींची पदे भरण्यास हायकोर्ट असमर्थ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या ३४ टक्के जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम खटले निकालात काढण्यावर होत आहे. न्यायाधीशांची कमतरता असल्यामुळे लाखो खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे न्यायमूर्तींची रिक्त पदे जलद गतीने भरण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल झाली आहे. मात्र त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. अन्य खंडपीठाकडे दाद मागण्याचा सल्ला मुख्य न्यायमूर्तींनी दिला.
मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची एकंदर ९४ पदे आहेत. मात्र सध्या ६२ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. म्हणजे ३४ टक्के जागा रिक्त आहेत. ही पदे लवकर भरण्यात यावी, अशा मागणीची याचिका विधी विभागाच्या प्राध्यापिका शर्मिला घुगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि माधव जमादार यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली. तेव्हा मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शवून अन्य खंडपीठाकडे दाद मागण्याचा सल्ला दिला. उच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या रिक्त जागा असल्यामुळे २ लाख ३१ हजार ४०१ दिवाणी आणि ३३ हजार ३५३ फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. ५ वर्षांत २ लाख ६४ हजार ७५४ खटले प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्यासाठी न्यायमूर्तींची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami