संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

लांज्यात टँकर कोसळल्यानंतर गॅसगळती मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक ठप्प

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रत्नागिरी – लांज्यातील अंजणारी पुलावरुन एलपीजी टँकर नदीत कोसळल्यानंतर त्यातून गॅसगळती झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. या महामार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. गेल्या 24 तासांपासून हा टँकर बाहेर काढण्यात आला नाही. त्यासाठी आता तीन मोठ्या क्रेन आणण्यात येणार आहे.
अपघातग्रस्त टँकर भारत पेट्रोलियम कंपनीचा आहे. हा टँकर मुंबई-गोवा महामार्गावरुन गोव्याच्या दिशेनं प्रवास करत होता. रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजणारी पुलावरून एलपीजी टँकर नदीपात्रात कोसळला. साधारणतः 24 ते 28 किलो एलपीजी या टँकरमध्ये आहे. याच अपघातग्रस्त टँकरमधून काही प्रमाणात गॅल लिक होत आहे. जोपर्यंत या अपघातग्रस्त टँकरमधून गॅस बाहेर सुरक्षित बाहेर काढला जात नाही, तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होणार नाही. त्यामुळे गेल्या 24 तासांपासून ठप्प असणारा महामार्ग आणखी किती काळ ठप्प राहणार असा प्रश्न उपस्थित होत असून या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पुणस, काजगघाटी, रत्नागिरी अशी वळवण्यात आली आहे. तसेच, मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक शिपोली, पाली, दाभोळे या मार्गावरुन वळवण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami