मुंबई : सध्या राज्यात अनेक मुली बेपत्ता होण्याची प्रकरणे वाढत चालली आहेत.राज्यातील अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याचे वक्तव्य महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बेपत्ता झालेल्या तरुणींना शोधण्यासाठी एक विशेष पथक नेमणार असल्याचे लोढा यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपासून देशभरात श्रद्धा हत्याकांडावरुन लव्ह जिहादच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे अशाच प्रकारे महाराष्ट्रातील अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचा संशय व्यक्त करतानाच अशा प्रकारे अनेक तरुणी बेपत्ता झाल्याची शक्यता महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. राज्य महिला आयोग आणि जिल्हा विधी प्राधिकरण, मुंबई उपनगर यांच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात लोढा यांनी याबाबतची मागणी लावून धरली. या पार्श्वभूमीवर बेपत्ता मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी महिला आयोगाद्वारे विशेष पथक नेमले पाहिजे, अशी मागणीही लोढा यांनी केली. राज्यातील अधिक मुली लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याचे लोढा यांनी सांगितले. ज्या मुली लग्नानंतर आपल्या परिवारातून दुरावल्या आहेत किंवा त्यांची काय स्थिती आहे. याचा शोध या पथकाद्वारे घेण्यात येणार आहे.याशिवाय मला असे 10 ते 12 प्रकरण माहिती आहेत.कदाचित शोधले तर यापेक्षा जास्त असू शकतात.हा हिंदू मुस्लीमचा प्रश्न नसून कोण कोणावर अन्याय करत आहे हा प्रश्न आहे त्यामुळे अन्याय होणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहायला आम्ही तयार आहोत, असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.