नाशिक: गेल्या कित्येक महिंनापासून राज्यभरात लमपीचा प्रादुर्भाव असून यासाठी पशु संवर्धन विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र अद्याप हा रोग आटोक्यात न आल्याने तसेच याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नाशिकच्या ओझरमध्ये आयोजित केलेली बैलगाडा शर्यत अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आली
रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला असून प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर यावर विचार केला जाणार असल्याचे गरमस्थांकडून सांगण्यात येत आहे.
दरवर्षी नाशिकजवळील ओझर परिसरात खंडोबा यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येते. खंडोबाची यात्रा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या जल्लोषात राज्यभरातून बैलगाडा शर्यत ओझरमध्ये दाखल होतात. मात्र राज्यासह जिल्ह्यात लम्पि आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून लम्पि आजाराने अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. ही साथ फोफावत असल्याने ओझर परिसरातील सर्व ग्रामस्थांसह आयोजकांनी बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत लम्पि ची साथ कमी होत नाही, तोपर्यंत पुन्हा बैलगाडा शर्यत चे आयोजन करण्यात येणार नसाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे खंडोबा यात्रेनिमित्त होणारी शर्यत आता रद्द करण्यात आली आहे.