संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

लग्नासाठी वराने दाढी करणे बंधनकारक; राजस्थानच्या १९ गावांचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जयपूर – राजस्थानमध्ये लग्नाबाबत एक अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थानच्या पाली जिल्ह्यात कुमावत समाजातील पंचांनी विवाह विधींमध्ये वराला क्लीन शेव्ह करणे बंधनकारक केले आहे. वर दाढी करून लग्नाला बसला तरच त्याला सात फेरे घेता येतील, असा कडक निर्णय जिल्ह्यातील १९ गावांच्या लोकप्रतिनिधींनी एका बैठकीत घेतला आहे.

विवाह हा संस्कार असून त्याचे पालन करणे आवश्यक आहे. विवाह सोहळ्यात वरालाच राजा म्हणून पाहिले जाते, त्यामुळे दाढी वाढवून विधी करणे कितपत योग्य आहे? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. लग्नात आम्हाला फॅशनची कोणतीही अडचण नाही. मात्र, दाढी वाढवून लग्न करणे समाजाला मान्य होणार नाही, असे मत पंचांनी व्यक्त केले. तसेच लग्नापूर्वी हळदी समारंभात पिवळे कपडे, पिवळी फुलं, मेकअप, इत्यादींच्या नावाखाली होणारी उधळपट्टी रोखण्यासाठीही अनेक नियम करण्यात आले आहेत. सर्व विधी जुन्या परंपरेनुसारच करावेत, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे सभेला उपस्थित राहणारे १९ गावांतील लोक देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असले, तरी त्यांना या नियमांचे पालन करावे लागेल, अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami