संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

लंडनमधील लिव्हरपूलमध्ये चाकू हल्ला! तीन जण गंभीर जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये भरदिवसा चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य लंडनमधील लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशनजवळ आज सकाळी चोरी करण्यासाठी आलेल्या काही चोरट्यांनी 3 जणांवर चाकूने हल्ला केला. हल्लेखोरांनी पळ काढला असून  जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9:46 वाजता बिशपगेटवर तीन जणांवर चाकू हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चोरटे चोरी करण्यासाठी आले होते. एका व्यक्तीचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न करताच त्या व्यक्तीने त्याला प्रत्युत्तर दिले. संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला . यात तिघेजण गंभीर जखमी झाल्यावर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान,पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा रक्त पसरलेले दिसले. स्थानिक पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.आरोपीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. घटनेचे व्हिडिओसुद्धा समोर आले आहेत. या हल्ल्यानंतर हा आतंकवादी हल्ला नसल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami