संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

लंडनच्या महाराणींवर १९ सप्टेंबरला होणार अंत्यसंस्कार ! भारतात उद्या शोक दिवस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन- ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी ८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले.त्या गेल्या कित्तेक दिवसांपासून आजारी होत्या. एलिजाबेथ यांच्या निधनानंतर दहा दिवसांनी म्हणजे १९ सप्टेंबरला महाराणी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.अंत्यसंस्काराचे विधी हे १२ दिवस चालणार आहेत.दरम्यान,काल शुक्रवारी राणी एलिझाबेथ यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स -३ हे नवे राजे म्हणून जेम्स पॅलेसच्या बैठकीत घोषित करण्यात आले आहे.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांना प्रिन्स फिलिप यांच्या शेजारी दफन केले जाणार आहे.महाराणी यांच्या पार्थिव शरीरास आज बंकिगघम पॅलेसमध्ये शाही ट्रेनने आणले असून आता १३-१६ सप्टेंबर दरम्यान महाराणी यांचा मुलगा चार्ल्स वेस्टमिंस्टर हॉलमध्ये शोकसभा करतील.त्यानंतर नवीन राजा म्हणून युनाईटेड किंगडमच्या दौऱ्याची सुरुवात करतील.उत्तर आयर्लंडला पोहचल्यानंतर बेलफास्टमध्ये सेंट ऐनी कॅथेड्रलमधील एका सेवेत भाग घेतील. त्यानंतर महाराणी यांचा ताबूत बंकिगघम पॅलेसमधून वेस्टमिंस्टर महलात नेला जाईल.ताबूत आल्यानंतर वेस्टमिंस्टर हॉलसमध्ये एक सेवा आयोजित केली जाईल.१७ ते १९ सप्टेंबर दरम्यान वेस्टमिंस्टर हॉलमध्ये त्यांचे पार्थिव शरीर ठेवले जाईल.दरम्यान लोक त्यांचे अंतीम दर्शन करतील. हॉल राणीच्या दर्शनासाठी रोज २३ तास खुला राहील. व्हीआयपी लोकांसाठी तिकीट दिले जाईल.दरम्यान,
भारतात उद्या रविवार ११ सप्टेंबर रोजी राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल दुखवटा पाळला जाणार आहे. यादिवशी महाराणी यांच्या सन्मानार्थ भारतीय राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार असून कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम देशात आयोजित केले जाणार नाहीत असे केंद्रीय गृहखात्याने जाहीर केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami