संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 02 April 2023

रोममधील बारमध्ये गोळीबार
तिघांंचा मृत्यू! चार जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रोम – इटलीच्या राजधानी रोममधील एका बारमध्ये काल संध्याकाळी एका इसमाने जोरदार गोळीबार केल्याने एकच गोंधळ उडाला. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांना गोळीबार करणाऱ्या इसमाला तात्काळ अटक केली.
रोममधील एका बारच्या ब्लॉकमध्ये स्थानिकांची बैठक सुरु होती. त्यावेळी एक इसम बंदूक घेऊन पोहोचला. ब्लॉकचा दरवाजा बंद केला. या इसमाने मी तुमच्यावर गोळीबार करण्यासाठी आलो आहे. तेथे उपस्थितीत लोकांनी एकच भाबंरी उडाली. त्यानंतर त्याने कशाचीही परवा न करता काही क्षणातच तेथे जोरदार गोळीबार सुरु केला. या गोळीबारात लोकांची धावपळ उडाली. या गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. इटलीच्या प्रधानमंत्री जियोर्जिया मेलोनी यांनी मृतांना श्रद्धाजंली वाहत दु:ख व्यक्त केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या