संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

रेल्वे रूळ ओलांडताना मोटरमनचा मृत्यू !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मध्य रेल्वेचे मोटरमन रामेश्वर मीना यांचा विद्याविहार येथे काल बुधवारी रात्री रुळ ओलांडताना लोकलने उडविल्याने मृत्यू झाला आहे.त्यांना गंभीर जखमी अवस्थेत राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले,परंतू. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच मीना यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांचे इंजिन ड्रायव्हर म्हणजेच लोको पायलट म्हणून बढती मिळाली होती.
मोटरमन रामेश्वर मीना ( ५३ ) हे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आपली ड्युटी संपवून विद्याविहार येथील लोकोशेडमध्ये जात असतानाच त्यांचा अंदाज चुकल्याने त्यांना भरधाव लोकलची जबर धडक बसली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली.जखमी अवस्थेत त्यांना राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.मीना हे रेल कामगार सेनेचे सदस्य होते. मोटरमनच्या समस्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता.त्यांच्या मृत्यूने रेल कामगार सेनेने दु:ख व्यक्त केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या