चंद्रपूर – चंद्रपूरमधील बल्लारपूर येथे रेल्वे ब्रिजचा स्लॅब कोसळल्याने दहा जण जखमी झाले आहेत. ओव्हरहेड वायर तुटल्याने पादचारी पुलावरुन पायी जात असलेले प्रवशी जखमी झाले.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटना घडल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरु झाले. पोलिस कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी मदतकार्यात सहकार्य केले. रेल्वे पूलावरुन पादचारी चालत असतांना अचानक ब्रिजचा स्लॅब कोसळला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. अनेकांनी ब्रिजवरुन उतरण्याचा आणि दुसऱ्या ब्रिजवर जाण्याचा प्रयत्न केला.या दरम्यानच ओव्हरहेड वायरचा काहींना धक्का लागला. त्यामुळे प्रवाशी जखमी झाले.