संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ मागे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी फलाट तिकीटांचा दर वाढवला होता, असे दर वाढवण्याचा विभागीय रेल्वे मॅनेजराचा अधिकार रेल्वे बोर्डाने काढला.मात्र आता रेल्वे प्रशासनाने हा प्लात्फोर्म तिकीट दरवाढ निर्णय मागे घेतला आहे.त्यामुळे आता मुंबईतील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

रेल्वेने मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली होती.अनेक स्टेशनवर तिकीट दर दहा रुपयांवरुन ३० ते ५० रुपये केले होते. या निर्णयला प्रवाशांनी विरोध केला.त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला. प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी २०१५ साली रेल्वे मॅनेजरकडे रेल्वे प्रशासनाने हे अधिकार दिले होते. रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे आता डीआरएमला प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढवता येणार नाहीत.यामुळे लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढीमुळे स्टेशनवर उगाचच येणाऱ्यांची संख्या घटेल, असा विश्वास रेल्वेला होता. यामुळे सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर ५० रुपये दर केले होते.प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्यामागे विशेष कारण चेन खेचण्याच्या घटना देखील होते.

एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या घटना घडल्या.यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे.अशा गैरकृत्यांमुळे अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या. शिवाय इतर प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला.ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलिंगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी सीएसएमटी,
मुंबई सेंट्रल, दादर, बोरीवली,वांद्रे टर्मिनस , वापी,ठाणे, कल्याण, पनवेल,वलसाड,उधना आणि सुरत येथील प्लॅटफॉर्म तिकिटच्य दरात ५० रूपये वाढ करण्यात आली होती.दक्षिण रेल्वेने देखील दरवाढ केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami