मुंबई – दिवाळीमुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली आहे.कारण रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर वाढवला आहे. तिकीटाचा दर २० रूपयांवरून थेट ५० रुपये करण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे.त्यामुळे सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी आणि पनवेल स्थानकांवर प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीटासाठी जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत. हे नवे तिकीट दर आज शनिवार २२ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. ३१ऑक्टोबरपर्यंत हे दर लागू असणार आहेत.