संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

रेल्वेची चाके भारतात बनणार खासगी कंपन्यांसाठी प्रथमच टेंडर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- रेल्वेची चाके आता भारतात तयार होणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने प्रथमच खासगी कंपन्यांना कारखाना सुरू करण्यासाठी टेंडर काढले आहे. या कारखान्यात दरवर्षी किमान ८० हजार चाके तयार केले जाऊ शकतात. याशिवाय सेलही १ लाख चाके तयार करणार आहे. अशा प्रकारे देशात पहिल्यांदाच रेल्वेची चाके तयार केली जात आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
भारतीय रेल्वेला दरवर्षी सुमारे २ लाख चाकांची गरज पडते. ती पूर्ण करण्यासाठी आता खासगी कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. खासगी कंपन्यांत मेड इन इंडिया रेल्वेची चाके बनवली जाणार आहेत. दरवर्षी ८० हजार चाके ६०० कोटींना रेल्वे खरेदी करणार आहे. याशिवाय स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) एक लाख चाकांची निर्मिती करणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे चक्क मेड इन इंडियाच्या चाकांवर धावणार आहे. भारतीय रेल्वे सध्या युक्रेन, जर्मनी, झेक रिपब्लिक या देशांमधून रेल्वेची चाके आयात करते. रशिया-युक्रेन युद्धामुळे रेल्वेला चाकांचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे सरकारने देशातच चाके बनवण्याचा निर्णय घेतला आहे. वंदे भारत ट्रेनसाठी ३९ हजार चाकांचे १७० कोटींचे टेंडर भारताने मेमध्ये एका चिनी कंपनीला दिले होते. त्यानंतर आता देशातच रेल्वेची चाके तयार केली जाणार आहेत. त्यात बुलेट ट्रेनच्याही चाकांचा समावेश आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami