संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

रेणापुरात गोगलगायीमुळे शेतकरी त्रस्त पीक नुकसान भरपाईसाठी बंद पाळला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लातूर – जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे गोगलगायीचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे.या प्रादुर्भावाचा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे.उगवलेले पीकच नष्ट होत आहे.दुबार-तिबार पेरणी करूनही गोगलगायीचा प्रादुर्भाव काही थांबण्याचे नाव घेईना,त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी या पीक नुकसानीची मागणी केली आहे.या मागणीसाठीच तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी नुकताच बंदची हाक दिली होती.या बंदला व्यापाऱ्यांनीही उत्स्फुर्तपणे पाठिंबा देत आपली देऊन कडकडीत बंद पाळला.
तसेच शेतकऱ्यांनी पिंपळ फाटा येथे जोरदार ठिय्या आंदोलन केले.
गोगलगायीच्या प्रादुर्भावाबाबत शासनाने तालुक्यातील ३३१५ शेतकऱ्यांच्या २५०० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याची यादी तयार केली आहे. मात्र या या यादीला शेतकऱ्यांचा विरोध असून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जावून पाहणी करून पंचनामे केलेले नाहीत.असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार तोंडी तक्रारी आणि लेखी निवेदने दिली आहेत. परंतु प्रत्यक्ष पंचनामे काही केलेले नाहीत.त्यामुळे हा बंद पाळून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात बाळासाहेब कातळे,संजय इगे,सचिन मोटेगावकर ,राजन हाके, प्रकाश जाधव,समाधान गाडे,विश्वनाथ गायकवाड यांच्यासह बहुसंखेने शेतकरी बांधव सहभागी झाले होते.दरम्यान,यावेळी तालुक्यातील गोगलगाय अनुदानात झालेला शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या १५ दिवसांत या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली.तसेच या बंद आणि ठिय्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाहीतर तर मात्र हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami