संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

रेणकापूरात गोठ्याला भीषण आग चार जनावरांचा होरपळून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वर्धा – जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याच्या रेणकापूर आज गुरुवारी मध्यरात्री गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून एक बैल जखमी झाला. तर आग विझवताना शेतकरी व त्याच्या मुलाला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रेणकापूर येथील शेतकरी आत्माराम निखाडे यांचा त्यांच्या घराजवळ गोठा आहे.गोठ्याला आज गुरुवारी मध्यरात्री ३ वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागली. यामुळे गोठ्याला बांधून असलेल्या पाच जनावरांपैकी चार जनावरांचा जळून मृत्यू झाला. तर, एक बैल गंभीर जखमी झाला. शिवाय या आगीत गोठ्यामध्ये ठेवलेले शेती साहित्यही जळून खाक झाले.गोठ्याला घर लागून असल्याने घरातील फ्रिज, पंखा आणी घरातील पलंगाचे सुद्धा नुकसान झाले असून जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami