संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

रुपी सहकारी बँकेला कायमचे टाळे! ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : बँकेत पैसे ठेवणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच रुपी सहकारी बँक बंद करणार आहे. महाराष्ट्रातील या बँकेला कायमस्वरुपी कुलूप लागणार आहे. आरबीआय नेहमी बँकांसाठी नियम जाहीर करते. एखाद्या बँकेत अनियमितता आढळल्यास त्यांना दंड लावते. मात्र बँकेच्या टाळेबंदात मोठा फरक आढळल्यास आणि अनियमितता जास्त असल्यास अशा बँकांना ग्राहकहितासाठी बंद करण्यात येते.

आरबीआयकडून पुण्यातील रुपी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आला होता. आता २२ सप्टेंबरपासून ही बँक बंद होणार आहे.आरबीआयने यापूर्वी ही अनेक बँका, वित्तीय संस्थांचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयने महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार, २२ सप्टेंबरपासून या बँकेला कायमस्वरुपी टाळे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकांसाठी अनेक प्रकारचे आदेश जारी केले जातात, त्याचं पालन करणं अनिवार्य असतं. तसेच आरबीआय बँकांसाठी सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचना जारी करत असते. या सूचनांचं पालन न करणाऱ्या वित्तीय संस्थांचा परवाना रद्द करण्यात येतो. त्यानुसार पुण्यातील रुपी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २२ सप्टेंबर रोजी ही बँक आपले कामकाज बंद करेल. त्यानंतर ग्राहक या बँकेत पैसे जमा करू शकणार नाहीत, तसेच बँकेतून पैसे काढू शकणार नाही. तसेच कुठलाही व्यवहार करू शकणार नाहीत. आरबीआयने सांगितले की, या बँकेकडे पुरेसा निधी आणि पुढे कमाई करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या बँकेचा परवाना रद्द करण्यात येत आहे. दरम्यान, बँकेत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना बुडीत ठेवींच्या प्रमाणात ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami