संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

रुद्रप्रयागसा भूस्खलन केंदारनाथ यात्रा थांबली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रुद्रप्रयाग – उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात भूस्खलन झाल्याने गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर बंद झाला. त्यामुळे बद्रीनाथ आणि कैदारनाथ यात्रा थांबवली आहे. तरसाळी गावाजवळ अचानक महामार्गावर दरड खाली आली. सुदैवाने प्रवासी सतर्क झाले आणि दोन्ही बाजूची वाहतूक थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
उत्तराखंडमध्ये गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रुद्रप्रयाग जिल्ह्यात गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील रानाचट्टी येथे भूस्खलन झाले. त्यामुळे दरडी महामार्गावर कोसळल्याचेे समजताच प्रवासी सतर्क झाले आणि वाहतूक बंद थांबवली.तेथे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बद्रीनाथ आणि कैदारनाथ यात्रेला जाणारे अनेक भाविक अडकून पडले. उत्तराखंडच्या काही जिल्ह्यांत उद्या शुक्रवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami