मुंबई -देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेलने दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या वस्तू, खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठी गुजरातमध्ये आपला नवीन ब्रँड ‘इंडिपेंडन्स’ लॉन्च केला आहे.कंपनी संपूर्ण गुजरातमधील एफएमसीजी किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याच्या योजनेवर काम करत आहे.त्यामुळेच फास्ट मूव्हीग कंझ्युमर पॅकेज्ड गुड्स ब्रँड ‘इंडिपेंडन्स’ बाजारात दाखल झाला आहे.
कंपनीने सांगितले की, ती इंडिपेंडन्स ब्रँडद्वारे खाद्यपदार्थ आणि दैनंदिन घरातील वस्तूंची विक्री करणार आहे.या ब्रँडद्वारे, गुजरातचा एफएमसीजी व्यवसाय वाढवण्यासाठी ‘गो-टू-मार्केट’ राज्य म्हणून विकसित करण्याची योजना आहे.लवकरच देशपातळीवर स्तरावर ब्रँड इंडिपेंडन्स लाँच करण्यात येणार आहे.
रिलायन्स रिटेलच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या,“मला आमचा एफएमसीजी ब्रँड इंडिपेंडन्स लॉन्च करताना आनंद होत आहे.यात खाद्यतेल,डाळी, तृणधान्ये, पॅकेज्ड फूड उत्पादने आणि इतर दैनंदिन गरजेच्या उत्पादनांची उच्च दर्जाची आणि परवडणाऱ्या श्रेणींचा समावेश आहे. अंबानी समुहाने एफएमसीजी क्षेत्रात आपला विस्तार करण्याची घोषणा केली होती.त्याअनुषंगाने इंडिपेंडन्स ब्रॅड ईशा अंबानी ४५ व्या एजीएममध्ये म्हणाली होती की कंपनी आपला एफएमसीजी व्यवसाय विकसित करेल. आता ब्रँड इंडिपेंडन्स लाँच करून त्यांनी या दिशेने आपला ठाम इरादा व्यक्त केला आहे.