संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

रिझर्व्ह बँकेची कारवाई! लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- आर्थिक संकटात सापडलेल्या सोलापूरच्या लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला. त्यामुळे या बँकेचे व्यवहार बंद झाले आहेत. ५ लाखांपर्यंत ठेवी असलेल्या ९९ टक्के ठेवीदारांना ठेव विमा अंतर्गत त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.

सोलापूर येथील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडे पुरेशी रोकड नाही. या बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. ती सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे खातेदारांचे हित लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने गुरुवारी २२ सप्टेंबरला या बँकेचे कामकाज संपल्यानंतर तिचा परवाना रद्द केला. ही बँक ठेवीदारांचे सर्व पैसे परत करू शकत नाही. त्यामुळे तिचा बँकिंग व्यवसायाचा परवाना आरबीआयने रद्द केला. त्यामुळे बँकेत ठेवी अडकलेल्या ९९ टक्के ठेवीदारांना जमा विमा आणि क्रेडिट गॅरंटी निगम ५ लाखांपर्यंतच्या ठेवींचे पैसे परत देणार आहे. ही रक्कम १९३.६८ कोटी आहे. राज्याचे सहकार आयुक्त आणि सहकार नोंदणी अधिकारी यांना रिझर्व्ह बँकेने ही बँक बंद करण्याचा आणि बँकेवर लिक्विडेटर नेमण्याचा आदेश दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami