मुंबई:- बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने गलवान प्रकरणावर वादग्रस्त ट्विट केल्यानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आले आणि तिच्याविरोधात तक्रारही करण्यात आली. प्रकरण तापलेले पाहून अभिनेत्रीने माफी मागितली पण त्यानंतरही हे प्रकरण थंडावताना दिसत नाही. तिच्या वादग्रस्त विधानावर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी अभिनेत्रीच्या बाजूने बोलले आहे. त्यामुळे बाॅलिवूड पुन्हा दोन गटात विभागले गेले आहे. काही कलाकारांनी तिला समर्थन दिले तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे.
अभिनेता अक्षय कुमारने रिचा चड्ढाच्या या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली होती. हे पाहून खूप दुःख झाले. आपल्या कोणत्याही कृतीने आपल्याला भारतीय लष्कराप्रती कृतघ्न बनवू नये. कारण आज ते आहेत म्हणून आपण आहोत. अक्षय कुमारने तिच्या ट्वीटवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
त्यावर आता प्रकाश राज यांनी अक्षय कुमारला फटकारले आहे.प्रकाश राज यांनी अक्षयच्या ट्वीटला रिट्वीट केले आहे. त्यावर ते म्हणाले, अक्षय कुमार मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुझ्यापेक्षा रिचा चड्ढा ही आमच्या देशाशी जास्त संबंधित आहे. या आधीही प्रकाश राज यांनी रिचा चड्ढाचे गलवानचा उल्लेख असलेल्या ट्वीटला समर्थन दर्शवले होते. रिचा चढ्ढा आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तुला काय म्हणायचे आहे ते आम्हाला माहीत आहे, असे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अभिनेत्री रिचा चढ्ढा विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रिचा चढ्ढा यांनी गलवान खोऱ्यात आपल्या सुरक्षा दलांनी केलेल्या बलिदानाची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे देशातील अनेकांचे मन दुखावले आहे. मी पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवावे, असे पत्र दिले आहे.