संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

राहुल नार्वेकर विजयी; महाराष्ट्राच्या विधानसभेला दिड वर्षांनी अध्यक्ष मिळाले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. अखेर या निवडणुकीत आज भाजपाने बाजी मारली. भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांना शिंदे गट, भाजपा आणि अपक्ष अशी एकूण १६४ मते मिळाली. तर, त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या राजन साळवी यांना १०७ इतकी मते मिळाली. तसेच रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. अशाप्रकारे एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेतील पहिली लढाई जिंकली.

कायदेतज्ज्ञ आणि सर्वच पक्षात मित्रत्वाचे संबंध असलेले अशी नार्वेकरांची ओळख आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे ते जावई आहेत. त्यामुळे राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सर्वोच्च पद हे एकाच कुटुंबात जाण्याचा दुर्मिळ योग यंदा घडला आहे. दरम्यान, नार्वेकर यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९७७ रोजीचा असून वयाच्या ४५व्या वर्षीच त्यांना अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे ते महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. ते कायद्याचे पदवीधर असून अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. यापूर्वी विधान परिषदेचे आमदार राहिलेले नार्वेकर २०१९ मध्ये पहिल्यांदाच कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले आहेत. खरंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेकडून झाली. शिवसेनेमध्ये ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जात असत. शिवसेनेतील आधुनिक आणि इंग्रजी बोलणारा, मीडियाचा जवळचा चेहरा अशी त्यांची ओळख होती. मात्र त्यानंतर त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला.

दरम्यान, असलेले नार्वेकर 2019 मध्ये पहिल्यांदाच कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले आहेत. भाजपाकडून विधानसभा अध्यक्षपदाची निवड झालेल्या नार्वेकरांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेकडून झाली. शिवसेनेमध्ये ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जात. शिवसेनेतील आधुनिक आणि इंग्रजी बोलणारा, मीडियाचा जवळचा चेहरा अशी त्यांची ओळख होती. मात्र त्यानंतर त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami