संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

राहुल गांधी 13 जूनला ईडीसमोर होणार हजर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी हे अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहणार आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नसल्यामुळे ते ईडीसमोर हजर होतील. राहुल गांधी येत्या १३ जूनला ईडी समोर हजार राहणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकारांना सांगितले की, कायद्याचे पालन करणारा आमचा पक्ष आहे. आम्ही नियमांचे पालन करतो. त्यांना बोलावले आहे तर ते नक्की जाणार. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. आम्ही भाजपसारखे नाही. आम्हाला आठवत की 2002 ते 2013 या काळात अमित शाह पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. खेडा म्हणाले की, आम्हाला कसलीही भीती नाही. ते लोक नियम मोडून नोटीस पाठवतात. त्यांना कळेल की ते कोणाच्या नादी लागले आहेत. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami